महात्मा फुले जयंती साजरी
महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्री शिक्षणाचे जनक होते-प्रा.अतुल दुबे
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुले केली. येणार्या काळात विद्यार्थ्यांनी व युवकांनी या महापुरुषाचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक चळवळ उभा करणे गरजेचे असून हेच महात्मा ज्योतिबा फुले यांना खर्या अर्थाने अभिवादन ठरणार असे वक्तव्य यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना व्यक्त केले.
नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा क्रांतीसुर्य महात्मा ज्येातीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.ए.डी.शेख, प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.यु.एम. फड, प्रा.एस.आर कापसे , प्रा.एस.के. अपार मॅडम, प्रा.पी.पी. परळीकर,एस.बी.अष्टेकर, जी.व्ही.कांबळे, यु.बी.जगताप, ए.बी.जगतकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा