इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया......

 जिल्हा वाहतूक शाखेची परळीत कारवाई

९५ वाहनधारकांकडुन ६६ हजारांचा दंड वसूल

परळी (प्रतिनिधी)

बीड जिल्हा वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांनी मंगळवार दि.१ एप्रिल रोजी परळी शहरात विविध ठिकाणी धडक मोहीम राबवत ९५ वाहनधारकांकडुन ६६ हजारांचा दंड वसुल केला.

  पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली ‌ जिल्हा वाहतूक शाखा बीड येथील पोउपनि.विजय जाधवर व 4 ट्राफिक अंमलदार आणि संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी येथील पीसी 1238 अमर व होमगार्ड यांच्या संयुक्त पथकाने परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,मोंढा आदी भागात वाहनाची तपासणी केली.यात ९५ वाहनांवर एमव्ही ऍक्ट केसेस करुन कारवाई करून 66,000 रुपये दंड वसूल करण्यात आला.या कारवाईत जुना  6800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या दरम्यान एका मोटरसायकलवर पुढील आणि मागील बाजूस नंबर प्लेट नसल्यामुळे संशयित वाटत असल्यामुळे सदर मोटरसायकलस्वार याच्याकडे चौकशी केली असता मोटरसायकल क्रमांक एम.एच. 22 बीबी 3261असा असून सदर  मोटरसायकल बाबत  पो. स्टे गंगाखेड येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यावरून गंगाखेड पोलिसांशी संपर्क साधून मोटरसायकल आणि आरोपी शेख मोहम्मद शेख रा.वैजवाडी ता.परळी यास गंगाखेड पोलिसांच्या  ताब्यात देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!