परळी वैजनाथ येथे शुक्रवारी होणार भव्य सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथे शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे भव्य सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग संस्थानमधील अन्नछत्र हॉलमध्ये दुपारी ५ ते सायंकाळी ८ वाजे दरम्यान हा सोहळा श्री दर्शक हाथी यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.


आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी सोमनाथ शिवलिंग पुन्हा प्रकट होऊन त्याची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सोमनाथ मंदिरात करणार असल्याची माहिती या वर्षाच्या सुरुवातीलाच दिली होती. सन १०२६ मध्ये मोहम्मद गझनीने सोमनाथ शिवलिंगाचा विध्वंस केला होता. पण, सनातन धर्माची ताकत आणि विश्वास यामुळे आता तेच शिवलिंग तब्बल १००० वर्षांनी पुन्हा प्रगट झाले आहे.


सोमनाथ मंदिरात हे शिवलिंग स्थापित करण्यापूर्वी देशभरात अयोध्या तसेच इतर धार्मिक स्थळी शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. जेणेरून त्या त्या भागातील भाविकांना त्यांच्या गावीच शिवलिंग दर्शन होईल. त्याचाच भाग म्हणून परळी वैजनाथ येथे शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी परळी वैजनाथ येथे भव्य सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संधीचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन परळी वैजनाथ आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने केले आहे.


यावेळी रूद्र पूजेचे आयोजन देखील केले आहे. ज्यांना रूद्र पूजेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी https://vdst.in/e/61660 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी  8390287777, 9860474821या क्रमांकावर संपर्क साधावा

असे आवाहन परळी वैजनाथ आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !