बिहार नव्हे हो.....बीड जिल्हा आहे रत्नांची खाण !!!

बीडच्या कन्येचं उत्तुंग यश: न्यायाधीश परीक्षेत ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली


बीड: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जे एम एफ सी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी ही राज्यात पहिली आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या १० गुणवंतांमध्ये नऊ मुलींचा समावेश आहे.

   कोरोना मुळे कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ ची परीक्षा लांबणीवर पडली होती कोरोना नंतर ९ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण परीक्षा झाली होती. २४ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यातील ३४३ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाली, १७ ते २९ मार्च या काळात मुलाखती पार पडल्या. परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून ११४ जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी निवड करण्यात आली आहे.पहिल्या १० टॉपर्स मध्ये नऊ मुलीअसून हे या निकालाचे वैशिष्ट्य ठरले.

      पहिल्या दहा टॉपर्स मध्ये नऊ मुली असून बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविले. ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली आली आहे. सायली संपत झांबरे हिने द्वितीय तर किरण संभाजी मुळीक हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर शिवानी रामनाथ फाडोळ, तन्वी रहमान शेख, सोनियाअविनाश गंडले, तनुजा रमेश कुसारे, सुवर्णा विनायक शास्त्री, वंदना अरविंद चामले, किरण शांताप्रसाद वर्मा, विपुल एकनाथ गुंजाळ, अनिकेत लिंबा राव कोकरे आदींची निवड झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !