परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

समाजातील गरजूंना मदत होईल असे कार्य करून जन्मोत्सव साजरा करणे ही काळाची गरज - जगदीश पिंगळे

पेशवा प्रतिष्ठान तर्फे विविध कार्यक्रमाने भगवान परशुराम जन्मोत्सव  उत्साहाच्या वातावरणात साजरा


अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-

 येथील पेशवा प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान श्री परशुराम जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे म्हणाले की, समाजातील गरजूंना मदत होईल असे कार्य करून जन्मोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. विविध संघटना वेगवेगळे उपक्रम राबवितात परंतु पेशवा प्रतिष्ठान यांनी राबविलेले उपक्रम हे नेहमीच समाजपयोगी असतात.

       यावेळी व्यासपीठावर  गणपतराव व्यास,  रामभाऊ कुलकर्णी, सौ रोहिणी पाठक यांची उपस्थिती होती. या प्रसंगी  मार्गदर्शन करताना व्यास गुरुजी म्हणाले की , तरुणांनी उद्योगाकडे वळावे,हि काळाची गरज असून सध्या सगळ्यांना नोकरी मिळणे शक्य नाही व व्यवसायात तरुणांना यश मिळण्यासाठी चिकाटी व प्रयत्न महत्वाचे आहेत. रामभाऊ कुलकर्णी ,रोहिणी पाठक , राहुल कुलकर्णी, प्रशांत बर्दापूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भगवान श्री परशुराम यांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर परशुराम विद्यार्थी सहाय्यक मंडळा तर्फे  पवन कुलकर्णी या एम बी बी एस ला शिकणाऱ्या विद्यार्थ्यास बिनव्याजी ५० हजार रू शैक्षणिक मदत देण्यात आली. मदतीचे हे चौथे वर्ष आहे.तसेच नवनाथ जोशी यांच्या नृसिंह वेदशाळेला रू पाच हजारांची मदत करण्यात आली. या प्रसंगी योगेश्वरी वधू वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन व समाज भूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी  प्रशांत बर्दापूरकर, डॉ कौस्तुभ कुलकर्णी, स्मिता भातलवंडे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा मुकुंद जोशी यांना पीएचडी मिळाल्याबद्दल तर सौ स्मिता धावडकर यांची उप मुख्याध्यकापदी पदोन्नती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महेश अकोलकर यांनी केले. सूत्र संचालन डॉ संकेत तोरंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रणिता पोखरीकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत श्रीकांत जोशी, केदार दामोशन , ऍड वैजनाथ वांजरखेडे, पार्थ कुलकर्णी, गौरव कुलकर्णी, अक्षय देशमुख,अनिता औटी, रोहिणी जड, अपर्णा भालेराव, साधना विर्धे यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ब्रह्मवृंदाची उपस्थिती होती.. कार्यक्रम यशस्वितेसाठी पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी विशेष पुढाकार घेतला होता.यावेळी ब्रह्मवृंदाची लक्षणीय उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!