परळीत विजेचा अखंडित खोळंबा: खासदारांच्या कार्यक्रमातही वीज गुल; नागरिकांतील संतापाच्या भावनांची दखल घ्या - ॲड. जीवन देशमुख 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

     परळीतील महावितरणाचा ठरलेला  नेहमीचा सिरस्ता सुरुच आहे. शहरात रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे खासदार स्वतः परळीत असतांना भर कार्यक्रमात ही वीज खंडित झाली. एवढा गलथानपणा सुरु असुन याची संबंधितांनी दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी दिला आहे.

    वीजवितरण कंपनीने मात्र नेहमीप्रमाणेच  आपला गलथान कारभार  सुरूच ठेवलेला आहे.भर उन्हाळा सुरु झाला तसा विजेचा लपंडावही सुरू झाला आहे. असंख्य वेळा नागरिकांनी आमच्या भागातील वीजपुरवठा  सुरळीत चालू ठेवावा, विविध ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर कराव्यात, वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी वारंवार मागणी केली पण याची दखल वीजवितरण कंपनीने घेतलेली नाही.याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे खासदार स्वतः परळीत असतांना भर कार्यक्रमात ही वीज खंडित झाली.यामुळेही संताप व्यक्त होत आहे.

     शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार