आ.सत्यजीत तांबे यांनी सहपरिवार घेतलं परळीत पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

  महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत व अभ्यासू आमदार म्हणून ओळख असलेल्या आ.सत्यजीत तांबे यांनी आज परळीत सहपरिवार  पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन घेतले.अत्यंत समाधानी व आध्यात्मिक अनुभूती देणारे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमांमधून दिली आहे.

    आ.सत्यजीत तांबे यांनी परळी वैजनाथ येथील प्रभुु वैद्यनाथ पुजा व दर्शनाचे छायाचित्र शेअर करुन परळीत अत्यंत समाधानी व आध्यात्मिक अनुभूती देणारे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्या सामाजिक माध्यमांमधून दिली आहे. त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आज कौटुंबिक कार्यानिमित्त बीड जिल्ह्यात आल्यावर, परळीच्या पवित्र भूमीत वसलेल्या श्री क्षेत्र वैजनाथ ज्योतिर्लिंग महादेवाचे दर्शन घेण्याचा योग आला. डॉ. मैथिली, अहिल्या, सूर्या आणि बीड जिल्ह्यातील काही स्नेही मित्र परिवाराच्या सान्निध्यात हे दर्शन अत्यंत समाधानी व आध्यात्मिक अनुभूती देणारे ठरले. महादेवाकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !