परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

कलेक्टर ॲक्शन मोडवर: बीड जिल्हयातील अवैध बॅनर, होडींग व पोस्टर्स बाबत कार्यवाहीचे आदेश

बीड, प्रतिनिधी....
     नव्यानेच आलेले जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांनी जिल्ह्य़ातील अवैध बॅनर, होडींग व पोस्टर्स बाबत  कार्यवाहीचे आदेश काढले आहेत.  उच्च न्यायालयाचे  आदेश, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र व प्रधान सचिव (नवि-2) नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधील निर्देशानुसार कार्यवाही करणे बाबतचे पत्र बीड जिल्हाधिकारी यांनी आज (दि.२८) निर्गमित केले आहे.

        जिल्हाधिकारी बीड यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात विविध सार्वजनिक सण उत्सव (रमजान ईद, रामनवमी, गुढीपाडवा, शिवजयंती, डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती इत्यादी जयंती यात्रा, ऊर्स, सप्ताह, जयंती, धार्मिक प्रवक्त्यांचे कार्यक्रम इत्यादी अनुषंगाने सर्व समाज व धर्माच्या लोक संघटना कडून आपापल्या परीने जिल्ह्यातील विविध चौकात, मुख्य रोडवर, सार्वजनिक ठिकाणी, मिश्र वस्तीत इत्यादी ठिकाणी विविध झंडे व त्यास अनुसरून बॅनर लावण्यात येत आहेत. तसेच सदरचे झेंडे व बनर सण, उत्सव, जयंती, यात्रा ऊर्स संपन्न होऊन बरेच दिवस झाले तरी ते काढण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून जिल्हयातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग होत आहे.
      त्याअनुषंगाने या बाबींचे गांभीर्य लक्षात घेवून अनाधिकृत होडींग्स, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे इ. बाबत  तातडीने आवश्यक ती कार्यवाही अनुसरावी असे पत्र आज दि. 28-04-2025 जिल्हादंडाधिकारी विवेक जॉन्सन  यांनी निर्गमित केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!