उन्हाचा तडाखा वाढला...काळजी घ्या....!

उष्माघाताने घेतला बळी!: भरउन्हात परळीच्या मोंढ्यातील हमाली करणारा युवक अचानक जागेवर कोसळला; जागीच मृत्यू


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       सध्या उन्हाची प्रचंड तीव्रता असुन तापमान 41 -42 अंश सेल्सिअस वर जात आहे. भर उन्हात अनेक कष्टकरी, कामगार हे काम करत असतात. परंतु कधीकधी हे कष्टही जीवावर बेतण्याचा प्रकार घडतो. असाच काहीसा प्रकार परळीच्या मोंढा मार्केटमध्ये घडला आहे. भर दुपारच्या वेळी, भर उन्हात अचानक एका युवकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान चांदापूर येथील रहिवासी असलेल्या हा युवक मोंढ्यात हमाली व्यवसाय करत होता. या युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

        याबाबत प्राप्त अधिक माहिती अशी की, चांदापूर येथील रहिवासी असलेला सचिन बळीराम काळे वय 35 वर्षे हा युवक मोंढ्यात हमालीचे काम करतो. नेहमीप्रमाणे मोंढ्यात कामासाठी सकाळपासूनच तो आला होता.आज दिवसभरात उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला होता. या भर उन्हात त्याने कामही केले. अचानक त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. काही वेळातच तो जागेवरच गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

       उन्हाच्या तीव्र झळांमध्ये भर उन्हाचा तडाखा बसून या युवकाचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाबद्दल परिचितांमध्ये दुःख व्यक्त होत आहे. मयत सचिन बळीराम काळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान सध्या वाढत्या उन्हापासून संरक्षण करून भर उन्हात नागरिकांनी शक्यतो बाहेर न पडता काळजी घ्यावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !