परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अचानक मुंबईला जावे लागल्याने पुढील दौऱ्यात परिवाराला भेटणार

स्व.बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांना ना. पंकजा मुंडेंनी दिला मायेचा आधार!

जिल्हाध्यक्षा मार्फत मदत सुपूर्द; पत्नीला नोकरी देण्याचा दिला शब्द


अचानक मुंबईला जावे लागल्याने पुढील दौऱ्यात परिवाराला भेटणार


बीड।दिनांक १९।

भाजपचे जिल्हा विस्तारक स्व. बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांशी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दुपारी दूरध्वनीवरून संवाद साधला. आगे कुटुंबाला आर्थिक मदत करत त्यांच्या पत्नीला नोकरी मिळवून देण्याचा शब्द त्यांनी दिला. बीडच्या पुढील दौऱ्यात आपण आगे परिवाराची  प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


   ना. पंकजाताई मुंडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घाटशीळ पारगाव येथे नारळी सप्ताहात उपस्थित होत्या. नियोजित दौर्‍यानुसार त्या किट्टी आडगाव येथे जाऊन स्व. बाबासाहेब आगे यांच्या परिवाराला भेटणार होत्या परंतू अचानक मिटिंगसाठी मुंबईला जावे लागल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यां समवेत आगे परिवाराची त्यांच्या घरी जावून भेट घेतली व ना. पंकजाताईंनी दिलेली   मदत सुपूर्द केली. यावेळी ना. पंकजाताईंनी दूरध्वनीवरून आगे यांचे आई वडील तसेच पत्नी व लहान मुलीशी संवाद साधत त्यांना धीर दिला व सांत्वन केले. पत्नीला नोकरी देण्याचा शब्द देत तुमच्या काळजी करू नका, मी तुमच्या पाठिशी सदैव राहील असा धीर त्यांनी यावेळी दिला. ना. पंकजाताईंनी दिलेल्या  या मायेच्या आधाराने आगे परिवाराला अश्रू अनावर झाले होते.


   भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, तालुकाध्यक्ष अरूण राऊत, नवनाथ शिराळे, रामराव खेडकर, रामदास बडे, डाॅ. अशोक तिडके, प्रकाश सुरवसे, श्रीकांत सानप आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!