यशस्वी भव!!!!...हार्दिक अभिनंदन!!!
कु.नेहा धोंडगे बनली डाॅक्टर: एमबीबीएस पदवी प्रदान
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी वैजनाथ येथील ज्ञानेश्वर धोंडगे यांची सुकन्या कु. नेहा ज्ञानेश्वर धोंडगे डॉक्टर बनली असुन नुकताच तिचा पदवीदान समारंभ पार पडला. यात एमबीबीएस ची पदवी तिला प्रदान करण्यात आली.
सोनपेठ तालुक्यातील आवलगाव येथील मूळ रहिवासी असलेले व हल्ली मुक्काम परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध टेलर ज्ञानेश्वर धोंडगे यांची सुकन्या कु. नेहा हिने अतिशय कष्टातून व अभ्यासातून एमबीबीएस ला प्रवेश मिळवला. एमबीबीएस ची पदवी तिने सर्वोत्तम गुणांनी संपादन केली असुन नुकताच पदवीदान समारंभही पार पडला. आपले एमबीबीएस चे शिक्षण तिने सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील बीके एल वालावलकर रुलर मेडिकल कॉलेज येथे पूर्ण केले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच तिला एमबीबीएस ची पदवी प्रदान करण्यात आली आहे. या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा