परळीत गोमातांना गुंगीचे औषध देण्याचा आघोरी प्रकार : पशुसंवर्धन मंत्र्यांकडून 'दखल' - रात्री उशीरा झाला गुन्हा 'दाखल' !

'एमबी न्यूजने' सर्वात आधी प्रकरण उजेडात आणताच झाली कारवाई 

परळी वैजनाथ। एमबी न्यूज वृत्तसेवा...

       गायींना गुंगीचे औषध देऊन त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसल्याचा प्रकार शहरात घडल्यानंतर स्नेहनगरमधील नागरिक पोलीस ठाण्यात गेले मात्र दिवसभरात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत 'एमबी न्यूज ने' हे प्रकरण सर्वात आधी पुढे आणल्यानंतर  राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर काल(दि.२६) मध्यरात्री परळीत पोलीसांनी या संतापजनक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

     परळी शहरातील स्नेहनगर भागात दि.२५ रोजी मध्यरात्रीनंतर साधारण २ वा.सुमारास गायींना खाण्याच्या पदार्थांमधून औषध देण्याचा संतापजनक प्रकार घडला. गायींना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न होता.  स्थानिक रहिवाशांनी  सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी स्नेहनगर भागातील नागरीक पोलीस ठाण्यात जमा झाले मात्र चौकशी करुन गुन्हा दाखल करु असे पोलिसांकडून सांगण्यात आले.दिवसभरात या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा नोंदवून घेतलाच नाही. या आघोरी प्रकाराचे वास्तविक व सविस्तर चित्र एमबी न्यूज ने बातमीच्या माध्यमातून सर्वांपुढे आणले. याची राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक व स्थानिक पोलिस निरीक्षक यांना  या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.गुंगीचे औषध मिश्रित पदार्थ खाल्याने ज्या गायी बाधित झाल्या होत्या त्यावर त्वरेने उपचार करण्यास  सांगितल्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी उपचार करून चार गायींना धोक्यात बाहेर काढले.


Click-संदर्भिय सविस्तर बातमी:■ *खळबळजनक व संताप आणणारी घटना: गाडी घेऊन आले, मध्यरात्रीनंतर गाईंना खाऊ घातल्या गुंगीच्या गोळ्या आणि डांबून घेऊन जाण्याचा प्रयत्न!


अखेर मध्यरात्री झाला गुन्हा दाखल...

    दत्तात्रय वामनराव दुंदुले यांच्या फिर्यादी वरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आघोरी प्रकाराचा घटनाक्रम फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, दि.२६/०५/ २०२५ रोजी रात्री 02.00 वा सुमारास  घराचे समोर कुत्रे भुंकत असल्याने दतात्रय दुंदुले यांनी घराच्या बाहेर गॅलरी मध्ये येवुन पाहीले असता  घरासमोरील पटांगणात गाई बसत असलेल्या ठिकाणी दोन अनोळखी इसम काहीतरी गाईला खाण्यासाठी टाकत होते. ते गाईने खाल्यानंतर थोड्याच वेळात तीन ते चार गाई जमीनीवर पडलेल्या दिसल्या त्यानंतर त्यांनी बाहेर येवून आरडा ओरडा केल्याने दोन अनोळखी इसम यांनी काही अंतरावर जवळच लवलेले चार चाकी वाहनात बसुन पळुन गेले. त्यानंतर त्यांनी गल्लीतील धनंजय सोळंके, राजेंद्र सोनी, वैजनाथ बेरुळे यांना फोन करून बोलावुन घेतले.पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता नाईट राउंडचे पोलीस कर्मचारी घटनेच्या ठिकाणी आले . त्यानंतर सकाळी पशु वैदयकीय अधिकारी यांना बोलावुन बेशुध्द झालेल्या गाईवर औषधोपचार केले. आमच्या गल्लीत मोकळ्या पटांगणात थांबलेल्या मोकार जनावरे यांचेवर  अनोळखी इसमांनी काहीतरी खाण्यास देवुन विषप्रयोग करून जनावरांना विकलांग करण्याचा व बेशुध्द करुन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या आशयाच्या फिर्यादीवरुन अनोळखी दोन इसमांवर पोस्टे परळी शहर येथे गुरन 93/2025 कलम 325,303(2), 62 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह दराडे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !