यादवकालीन सकलेश्वर (बाराखांबी) महादेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा
आमदार नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
अंबाजोगाई : येथील १२व्या शतकातील यादवकालीन सकलेश्वर (बाराखांबी) महादेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.
आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मंदिराच्या ९,७३७चौ. मी. परिसरातील १९२ चौ. मी. भाग संरक्षित म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मंदिराचे जतन व संवर्धन होणार असून, पर्यटनालाही चालना मिळणार आहे. मंदिराच्या ऐतिहासिक आणि यदृष्ट्या महत्त्वामुळे स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा