नगर परिषदेचा कारभारच मनमानी: नागरिकांवर बेतली 'पाणीबाणी' !



पाणीपुरवठ्याचे नियोजन लावा अन्यथा तीव्र आंदोलन- रिपाई नेते माधव ताटे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   परळी वैजनाथ नगर परिषदेचा मनमानी कारभार होत आहे मात्र भरपूर पणी असुनही नियोजनाच्या अभावाने कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी परळीकराची वणवण होत आहे.त्यामुळे पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन लावा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा रिपाई नेते माधव ताटे यांनी दिला आहे.

 परळी वैजनाथ शहरातील पाणीपुरवठा नियोजन ठप्प झाले आहे.  वाण धरणामध्ये पुरेसे पाणी असतानाही पाण्यासाठी अनेक वस्त्यांमध्ये अवेळी पाणी येणे,  कधी 8 दिवसाला, कधी 6 दिवसाला, कधी 5 दिवसाला, कधी सकाळी, कधी दुपारी  कधी संध्याकाळी असे पिण्याचे पाणी सोडले जात आहे. ज्यांना बोरचे पाणी मिळत नाही अशांना याचा खूप त्रास होत आहे. पाणी विकत घ्यावे लागत आहे. सिद्धार्थनगर येथे तर पाण्याची कोणतीही एक वेळ नाही. मनाला येईल त्या कोण्या वेळेला पाणी सोडले जाईल याचा नेम नाही. याबाबत अनेक वेळा तोंडी,  फोन वर अधिकाऱ्यांना सांगूनही काही फरक दिसत नाही. यामुळेच येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.  पाणी पुरवठा सुरळीत व वेळेवर नाही झाल्यास न प वर आंदोलन करावे लागेल  असा इशारा रिपाई नेते माधव ताटे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !