बाजीप्रभू नगर नगर, पंचवटी नगर येथील हनुमान मंदिरात उत्साहात हनुमान जन्मोत्सव
परळी :शहरातील बाजीप्रभू नगर नगर, पंचवटी नगर येथील हनुमान मंदिरात सकाळी सहाच्या सुमारास हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला .
यानिमित्त माऊली भजनी मंडळाच्या महिलांनी भव्य ग्रंथ दिंडी , शोभायात्रा काढली या शोभा यात्रेमध्ये कलशधारी महिला व भगवे पताका हातात घेऊन महिला मुले सहभागी झाले होते. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तसेच श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त ज्ञानेश्वरी पारायण व काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले. सहा एप्रिल रोजी ज्ञानेश्वरी पारायनास सुरुवात झाली. 13 एप्रिल रोजी सांगता होणार आहे .रविवारी 13 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ह भ प जनाबाई कोकाटे संगमकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .येथील श्री हनुमान मंदिर बाजीप्रभू नगर मध्ये होणाऱ्या या काल्याच्या कीर्तनास उपस्थित राहावे असे आवाहन माऊली भजनी मंडळ व समस्त भाविकांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा