वीज पडून वृद्ध आणि गाय दगावले
केज :- केज तालुक्यातील केकाणवाडी येथे वीज पडून वृद्ध शेतकरी आणि त्याची गाय दगावली आहे.
गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी ४:३० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील आडस, केकानवाडी या भागात विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी देविदास शहाजी केकाण वय ६५ वर्ष रा. केकाणवाडी यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. मयत शेतकरी देविदास केकाण हे आसरडोह रस्त्या नजीकच्या नवरुका नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारात जनावरे चारीत होते. यावेळी अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली उभे होते. यावेळी या झाडावर वीज कोसळून शेतकरी देवीदास केकाण जागीच ठार झाले तर त्यांची एक गाय ही दगावली आहे.
________________________________
महसुलाचे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर
या नैसर्गिक आत्तीची माहिती मिळताच तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आदेशा वरून तलाठी शिंदे हे अपघातस्थळी हजर झाले. मयत शेतकरी देविदास केकाण यांचे आडस येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून गाईचे सुद्धा पशू वैद्यकीय अधिकारी हे शवविच्छेदन करणार असल्याची माहिती तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा