धनंजय मुंडे आज पिंपळनेर मध्ये; भगवानगडाच्या नारळी सप्ताहात राहणार उपस्थित
धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष?
बीड (प्रतिनिधी) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे आज शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
धनंजय मुंडे हे सकाळी ११ वाजता पिंपळनेर येथे हेलिकॉप्टर द्वारे येणार असून ते गडाच्या नारळी सप्ताहात उपस्थित राहतील. सप्ताहाचा समारोप हा गडाचे महंत न्यायाचार्य ह भ प डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून याप्रसंगी उपस्थित मान्यवरांसोबत धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान धनंजय मुंडे हे भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात येत आहेत. आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून ते सार्वजनिक व्यासपीठावर बोलले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा