डॉ.बाबासाहेबांनी  आम्हाला अहंकारी  होऊण्या पेक्षा  आत्मविश्वासी होण्याचे तंत्र  दिले - प्रा. माधव रोडे

 बाबासाहेबांनी आम्हा धैर्यने संघर्ष करण्याची शिकवण दिली - प्रा. माधव रोडे

सोनपेठ : - दिं. १४ एप्रिल २०२५ रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंती महोत्सवात , मौजे. गवळी पिंपरी येथे मोठा उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. माधव रोडे यांच्या व्याख्यानाच्या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दत्तात्रय पांचाळ होते. तर प्रमुख विशेष उपस्थिती सोनपेठचे पोलिस निरिक्षक एस एन बोलमवाड , गटविकास अधिकारी अजिंक्य सुर्यवंशी , प्रभाकर सिरसाट , माजी सरपंच गोपाळ भोसले , शिवाजी भोसले , नासेरभाई पठाण आदि होते. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ध्वजारोहण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधव रोडे म्हणाले , हजारो वर्षापासुन भेदा भेद करून मानसांना माणुस म्हणुन त्यांना अस्थितीत्वहिन करून हक्क डावलणाऱ्या अशा लोकांसाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. शौर्य म्हणजे धैर्य सामर्थ्यची  क्षमता 

शिकवण आम्हा दिली. बाबासाहेबांनी वंचित गोर गरीब दिन दलितांच्या जीवनातील आत्मविश्वास भरला , त्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर भेदभाव, सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. त्यातून त्यांनी आम्हाला संयमाने , धौर्याने संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देऊन शिका , संघटित व्हा , संघर्ष करा ! मंत्र दिला. अहंकाराने नव्हते तर आत्मविश्वास - आत्मसन्मानाने जगण्याचा तंत्र सूत्री दिले. अहंकारी लोकांना वाटते मला सगळ काही ज्ञान आहे आता घेरण्यासाठी शिकण्यासाठी काही बाकीच राहिलेले नाही. तर आत्मविश्वासी लोक नेहमी शिकण्यास तयार असतात. बाहय साहस असलेली व्यक्ती , मरण्याची हिंमत ठेवते तर आंतरिक साहस असणाऱ्याकडे , जगण्याची हिंमत असते म्हणून बाबासाहेबांनी तथागताचा बौद्ध धम्म मार्ग आम्हाला दाखवला व स्वयंम प्रकाश व्हाला सांगितले.  या कार्यक्रमाचे  संतोष साळवे , सुनिल बोकरे , शाम बोकरे , सोमनाथ बोकरे , संतोष बोकरे सह भिमसागर मित्र मंडळ , गवळी पिंपरी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !