पहलगाम घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क: परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात तपासणी मोहीम व प्रतिबंधात्मक सतर्कता

परळी वैजनाथ....

      जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सर्वत्र सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता पाळली जात आहे. याच अनुषंगाने बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र व दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात काटेकोर तपासणी मोहीम व सुरक्षाविषयक प्रतिबंधात्मक सतर्कता पाळण्यात येत आहे.

      परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने कडक देखरेख व प्रतिबंधात्मक तपासणी मोहीम  राबविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल (RPF) कडून सुरक्षा बळकटी करणाच्या अनुषंगाने कडक देखरेख व प्रतिबंधात्मक तपासण्या करण्यात आल्या.या कारवाई दरम्यान पार्सल कार्यालय, गाड्यांमध्ये, तसेच स्थानक परिसरात तपासणी करण्यात आली. प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. संशयास्पद किंवा गुन्हेगारी कृती आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानक परिसरात आढळून आलेल्या अनधिकृत व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. यावेळी मोहिमेत आरपीआयएफ निरीक्षक  परळी एस. बी. कांबळे, उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक आदी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !