आ. धनंजय मुंडे यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नातून अंबाजोगाई येथे शेतकरी भवन उभारणीस 1.52 कोटी रुपये निधी मंजूर
सभापती ॲड राजेश्वर आबा चव्हाण यांसह संचालक मंडळाने राज्य शासनासह धनंजय मुंडे यांचे मानले आभार
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई येथे नवीन शेतकरी भवन उभारण्याच्या १ कोटी ५२ लाख ६८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास सहकार विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुसज्ज असे शेतकरी भवन उभारण्यात यावे, यासाठी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण यांच्या सह सर्व संचालक मंडळाच्या वतीने धनंजय मुंडे यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी ही मागणी राज्य शासनाकडे करून पाठपुरावा करून सदर प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिली असून, याबद्दल अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण, उपसभापती श्री करनर यांच्या सह सर्व संचालक मंडळाच्या वतीने राज्य शासनाचे व आ. धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा