प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले, पाण्यावर तरंगणारे रामसेतू दगड रामनवमीला परळीत !
रामभक्तांनी गोराराम मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यावा - वैद्यराज रामदास दादा रामदासी
रामायण काळामध्ये राक्षस रावणाने माता सीताचे अपहरण केल्या नंतर प्रभु रामचंद्र लक्ष्मण परमभक्त हनुमान हे वानर सेनेसह माता सीतेस शोधण्या करीता निघाले हनुमंत रायाने लंकेला जावुन माता सीता लंकाधिपती राक्षसराज रावणाच्या ताब्यात आहे असे प्रभु रामचंद्रास सांगीतले. त्यावरुन प्रभु रामचंद्र सर्व वानर सेनेसह लंके करीता निघण्यास तयार झाले परंतु समुद्रमार्गाने जाता येत नव्हते म्हणुन वानर सेनेने समुद्र तटावरील दगड राम नाम लिहुन समुद्रातील पाण्यामध्ये टाकले यावेळी चमत्कार झाला व राम नाम लिहीलेली सर्व दगडे पाण्यावर तरंगु लागली व या तरंगणा-या दगडाच्या पुलावरुन प्रभु रामचंद्र व सर्व वानर सेनेने लंकेला जावुन राक्षस रावणाचा वध केला.
लंकेचे राज्य रावणाचा भाऊ बिभिषणाकडे सुपुर्द केले व माता सीतेस आयोध्या नगरीत परत आणाले ज्या रामसेतु वरुन जाऊन माता सीतेस परत आणले त्या रामसेतुचे पाण्यावर तरंगणारे व प्रभु रामाचे पद स्पर्शाने पावन झालेले दगड प्रभु रामचंद्राने स्थापन केलेल्या शिवलिंग रामेश्वर येथुन एका चमत्काराने प्राप्त झाले असुन हे पाण्यावर तरंगणारे चमत्कारीक दगडाचे दर्शन रामभक्तांना व्हावे या करीता राम नवमीच्या पावन दिनी परळीतील पुरातन अशा जाज्वल्य ठिकाण असलेल्या गोराराम मंदीर गणेशपार या ठिकाणी दर्शना करीता ठेवण्यात येणार आहेत. या रामसेतुच्या तरंगणा-या दगडाचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष प्रभु रामचंद्राचे दर्शन होय.
या रामेश्वर येथून आणलेल्या रामसेतुच्या दगडाचे व राम लल्लाचे दर्शनाचा सर्व रामभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोराराम मंदीराचे मठाधिपती वैद्यराज रामदास (दादा) रामदासी, लक्ष्मण बुवा रामदासी व नंदकुमार रामदासी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा