सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची घेतली गंभीर दखल

 परळीतील सरस्वती नदीची केलेली दुरावस्था,कचऱ्याचे ढीग अन् नदीवरील अतिक्रमण बघून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे प्रचंड संतापल्या!

सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची घेतली गंभीर दखल

शहरातील अतिक्रमणे,  घाणीच्या साम्राज्याबद्दल पालिका प्रशासनाला घेतले फैलावर


परळी वैजनाथ ।दिनांक ०४।
शहरातील सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्याचे होत असलेले काम आणि साचलेल्या घाणीच्या साम्राज्याबद्दल राज्याच्या
पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पालिका प्रशासनाला आज चांगलेच फैलावर घेतले. सरस्वती नदीची पाहणी करत नदीतील अवैध बांधकाम, अतिक्रमण व साचलेला कचरा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

पुरातन काळापासून शहरातील गावभागातून सरस्वती नदी वाहते. या नदीचे धार्मिक व पौराणिक महत्व मोठे आहे. सरस्वती नदीवर काल काही भूमाफियांनी अतिक्रमण करीत अवैधपणे खोदकाम सुरू केले होते. भाजपा कार्यकर्त्यांकडून याची माहिती परळी दौऱ्यावर असणाऱ्या पर्यावरण व पंकजाताई मुंडे यांना देण्यात आली. याची तातडीने दखल घेत त्यांनी आज या ठिकाणी भेट दिली. सरस्वती नदीतील अतिक्रमण, झालेले खोदकाम, टाकण्यात येत असलेला भराव हे सर्व पाहून त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला याचा कडक शब्दात जाब विचारला आणि हे सर्व अवैध खोदकाम थांबवण्याचे आदेश दिले. नदीत साचलेला कचराही त्वरित उचलण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.

मुळा-मुठाच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करू
--------

नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाअंतर्गत लवकरच या सरस्वती नदीचे पुण्याच्या मुळा मुठा नदीच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करू असं त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.नदीवरील अतिक्रमण व गाळ तसेच जागोजागी पसरलेल्या घाणीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पुढील दौऱ्यापूर्वी घाण, कचरा हटवून परिसर स्वच्छ झाला पाहिजे अशी तंबीच त्यांनी दिली. कचऱ्याबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तात्काळ दखल घेऊन कार्यवाहीचे आदेश दिल्याने परळीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार