भाजप कार्यकर्त्याचा हत्येतील आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी
माजलगाव दि.१६- मंगळवारी माजलगाव शहरात भर रस्त्यावर भाजपचे कार्यकर्ते बाबासाहेब प्रभाकर आगे यांच्या झालेल्या निर्घृण हत्यानंतर आरोपी नारायण शंकर फपाळ यास येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरा पाठीमागे रस्त्यावर भाजप कार्यालयाच्या समोर भाजप बूथ विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे हा उभा असताना तेथे आरोपी नारायण शंकर फपाळ याने आगे यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने नारायण याला पछाडले होते व त्यातून त्याने ही हत्या केली.घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. या आरोपीस पोलिसांनी बुधवारी माजलगाव येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता आरोपी नारायण फपाळ यास दि.१९ पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश दिंडे हे करत आहेत. दरम्यान बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी येथे भेट देऊन या घटने प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्याशी चर्चा करून या तपासाची अधिक माहिती घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा