किसान पुत्र आंदोलन: ४ मे रोजी एक दिवसिय शिबीराचे आयोजन

--------अमर हबीब................

 अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- 

४ मे २०२५ हा दिवस राखून ठेवा. त्या दिवशी आपण समजावून घेऊ, नव्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या. कोणते कायदे गळफास आहेत, याची माहिती. शिवाय शेतकरी स्वातंत्र्यासाठी काय करावे लागेल यावर विचारविमार्श.

किसानपुत्र आंदोलनाचे एक दिवसाचे शिबीर ४मे रोजी आंबाजोगाईच्या पत्रकार कक्ष (नगर पालिका कार्यालय परिसर) येथे होणार आहे. त्यासाठीची नाव नोंदणी सुरू केली आहे.

फक्त ५० शिबिरार्थी भाग घेऊ शकतात. २० जणांनी नावे नोंदवली आहेत. या पुढे फक्त ३० नावे घेतली जातील. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे उशीर करू नका. 

शिबीर सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल व सायंकाळी पाच वाजता संपेल. सकाळी व संध्याकाळी चहा दिला जाईल. दुपारी साध्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

शिबिरात पूर्णवेळ सहभाग घेतलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.अमर हबीब 8411909909 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी.पूर्ण नाव-

गाव, तालुका, जिल्हा-मोबाईल नंबर-शिबिरात सहभागी होण्याचे कारण-एवढी माहिती पाठवली की नाव नोंदणी होईल. तुम्हाला शिबिराच्या ग्रुप मध्ये जोडले जाईल. त्या ग्रुपवर सर्व माहिती दिली जाईल.नव्या परिस्थितीत शेतकरी प्रश्न जाणून घेण्यासाठी, शेतकरीविरोधी कायदे समजावून घेण्यासाठी, ४ मे रोजी आंबाजोगाई येघे होणाऱ्या शिबिरात जरूर सहभागी व्हावे असे आवाहन अमर हबीब, किसानपुत्र आंदोलनआंबाजोगाई यांनी केले आहे.

 संपर्क -8411909909

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !