परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

गुंगीची औषधे लावलेली खारीबुंदी, बिस्किटं ,शेंगदाणे व पाव घटनास्थळी आढळली

खळबळजनक व संताप आणणारी घटना: झायलो घेऊन आले,मध्यरात्रीनंतर गाईंना खाऊ घातल्या गुंगीच्या गोळ्या आणि डांबून घेऊन जाण्याचा प्रयत्न

परळीतील अनेक दिवसांपासून बहुचर्चित 'झायलो' गाडीचा 'झोल' आला समोर 


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

    परळी वैजनाथ शहरातील स्नेहनगर भागात मोकळ्या जागेत असलेल्या गाईंना डांबून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा खळबळजनक प्रकार दि. 25 रोजी मध्यरात्रीनंतर साधारण दोन वाजण्याच्या सुमारास घडला असुन या गाईंना गुंगीच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्याचेही पुढे आले आहे.दरम्यान याप्रकरणी आता स्नेहनगर मधील नागरिक संतप्त झाले असुन संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाई करून कडक शासन करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे.

           याबाबत प्राप्त माहितीनुसार ,परळी शहरातील स्नेहनगर या भागात मध्यरात्री दोन वाजल्यानंतर एक झायलो गाडी या भागात फिरत असताना दिसुन आली. ही गाडी एका मोकळ्या मैदानात थांबवून त्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानात काही लोक गाडीतून उतरले. त्यानंतर या गाडीतून उतरलेल्या लोकांनी चार गाईंना गुंगीच्या गोळ्या खाऊ घातल्याचे पुढे आले आहे. गुंगी येऊन या गाई खाली जमिनीवर कोसळल्यानंतर या गाई या 'झायलो' गाडीत डांबून टाकत असताना याच भागातील एका महिला नागरिकाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर काही नागरिक जमा होत असल्याचे दिसताच या गाडीतून उतरलेल्या लोकांनी ही झायलो गाडी घेऊन तिथून पळ काढण्यात यशस्वी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी स्नेहनगर मधील शेकडो नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले. गोवंश व गोमातेचे अशा पद्धतीने अमानुषरित्या गुंगीच्या गोळ्या देणे व तस्करीच्या उद्देशाने त्यांना घेऊन जाणे हा चीड व संताप आणणारा प्रकार असल्याचे या नागरिकांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. दरम्यान पोलीस याबाबत सखोल तपास करत असुन हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचीही माहिती आहे.

गुंगीची औषधे लावलेली खारीबुंदी, बिस्किटं ,शेंगदाणे व पाव घटनास्थळी आढळली !

        काल दि. 25 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास स्नेहनगर मधील मोकळ्या मैदानात गाईंबाबत हा जो कुकर्माच्या प्रकार घडला. या घटनास्थळावर खारी बुंदी, बिस्किटे, शेंगदाणे ,पाव आदी अन्नद्रव्ये सापडली असुन सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या भागातील नागरिकांनी बोलवले असता या अन्नद्रव्यांना गुंगी येण्याचे औषध लावून त्यांना खाऊ घालण्यात आल्याचे प्राथमिक मत त्यांनी मांडले. गाई व गोवंशाला अशा पद्धतीने गुंगीच्या औषधांचा वापर करून व डांबून घेऊन जाण्याचा हा प्रकार खळबळजनक प्रकार पुढे आल्याने नागरिकांच्या भावना संतप्त आहेत.

गाईंवर उपचार सुरु...

     गुंगीचे औषध खाऊ घालण्यात आलेल्या या घटनेतील पीडित गाईंवर पशुवैद्यकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केलेले आहेत दरम्यान गुंगीचे औषध पोटात गेल्याने या गाई जमिनीवरच खूप वेळ निश्चित पडलेल्या होत्या सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन या सर्व गाईंची तपासणी केली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत


परळीतील अनेक दिवसांपासून बहुचर्चित 'झायलो' गाडी !

          गोवंश तस्करी व गायींना डांबून घेऊन जाण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून परळी शहरात एका झायलो गाडीची नेहमीच चर्चा असते. काही दिवसांपूर्वी परळीतील गोरक्षकांनी तीन दिवस बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणावेळीही या उपोषणकर्त्यांनी प्रामुख्याने झायलो गाडीतूनच अशा पद्धतीचे कुकर्म परळीत घडतात असा आरोप केला होता. तसेच या गाडीचा शोध घेऊन ही गाडी कोणाची, व ही गाडी वापरून अशा पद्धतीची कृत्ये करणारे कोण? याचा शोध घ्यावा अशी प्रमुख मागणीनीही केली होती. ज्या ज्या वेळी गोवंश तस्करी,गुरे डांबून घेऊन जाणे हा विषय समोर येतो त्या त्या त्यावेळी झायलो गाडीची चर्चा होत असते. दरम्यान कालच्या घटनेतही हीच बहुचर्चित झायलो गाडी होती का ? ही कोणाची गाडी आहे, ही गाडी कोण वापरतो व झायलो आणि गोवंश तस्करी याचा काय संबंध आहे? याचा सखोल शोध घेणे गरजेचे आहे.


गुन्हा दाखल करण्याची पोलीस प्रक्रिया सुरु....

      याप्रकरणी स्नेह नगर भागातील नागरिक संतप्त झाले. नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले व या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस प्रक्रिया सुरू झाली असुन या घटनेचा तपास करून पोलीस संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. या नगर मधील झालेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असल्याचेही समोर आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!