परळीत वाहनातील बॅटऱ्या चोरणारांना पकडलं; मुद्देमालही केला हस्तगत !
परळी वैजनाथ,प्रतिनिधी...
शहरात ठीक ठिकाणी लावलेल्या मोठ्या वाहनांमधील बॅटऱ्या काढून चोरून घेऊन जाणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली होती. या चोरांपर्यत पोहोचण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे. मोठ्या ट्रक मधील बॅटऱ्या काढून चोरून घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना शहर पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून तीन ट्रक मधील 63 हजार रुपये किंमतीच्या सहा बॅटऱ्या हस्तगतही करण्यात आल्या आहेत.
याबाबत परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील पार्क केलेल्या ट्रक व अन्य मोठ्या वाहनातील बॅटऱ्या चोरीचे प्रकार समोर येत होते. या संदर्भाने तीन ट्रक मालकांनी अंबाजोगाई रस्त्यावर लावलेल्या ट्रक मधील बॅटऱ्या काढून चोरीस गेल्या बाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या अनुषंगाने तातडीने तपास करत बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा शोध पोलिसांनी घेतला. या तपासात शहर पोलिसांनी रेहान शेख मुस्तफा व अन्वर खान जलाल खान पठाण दोघेही राहणार गौतम नगर परळी वैजनाथ या दोन आरोपींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर या दोन आरोपींकडून तीन ट्रक मधील 63 हजार रु. किंमतीच्या सहा बॅटऱ्या हा मुद्देमाल हस्तगतही करण्यात आला आहे. दरम्यान या आरोपींच्या माध्यमातून वाहनांमधून बॅटऱ्या काढून चोरून नेणाऱ्या आणखी आरोपींपर्यंत पोहचायची शक्यता असुन अन्य बॅटऱ्या चोरीच्या घटनाही उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा