बातम्यांतील उतावळेपणा: बेल्स पाल्सी नंतर नव्याने अर्धांगवायू झाल्याच्या प्रसारित बातम्या : धनंजय मुंडेंनी केलं स्पष्टीकरण
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता व त्यांना त्याचा त्रास होत असल्याचे विधान केले होते. या विधानावरून काही उतावळ्या वृत्तवाहिन्यांनी बेल्स पाल्सी नंतर धनंजय मुंडेंना नव्याने अर्धांगवायूचा झटका आल्याचे मथळे देऊन बातम्या प्रसारित केल्या. त्यामुळे धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नंतर आणखी एक आजार झाला आहे असा मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण होत आहे. आता याबाबत धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण केले असून दीड महिन्यापूर्वी बेल्स पाल्सी हा आजार आपल्याला झाला होता. त्याचाच आज पर्यंत त्रास सुरू आहे. मात्र बेल्स पाल्सी नंतर नव्याने आपल्याला कोणताही आजार झाला नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी सामाजिक माध्यमातून स्पष्टीकरण केले आहे.
● काय आहे धनंजय मुंडे यांची पोस्ट
"आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार.
मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा