ना. पंकजा मुंडेंची गुरूजींविषयी कृतज्ञता !

अमृत महोत्सवानिमित्त घरी येऊन केलेल्या सन्मानाने नानेकर गुरुजी भारावले


परळी | दि. ०४ | 

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांचे शालेय शिक्षण शहरातच झाले, हे सर्वांनाच ज्ञात आहे. मंत्री झाल्यानंतरही त्यांची नाळ सर्व सामान्य जनतेप्रमाणेच शाळेतील त्यांच्या शिक्षकांशी आजही कशी जोडली गेली आहे, याचा प्रत्यय आज येथे आला. 


 सरस्वती विद्यालयातील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक सुभाषराव नानेकर हे ना. पंकजाताईंचे शिक्षक.. त्यांचा नुकताच अमृत महोत्सव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ना. पंकजाताई उपस्थित राहू शकल्या नव्हत्या, पण त्यांनी दूरध्वनीवरून त्यांना  शुभेच्छा दिल्या होत्या. गुरूजींच्या कार्यक्रमाला आपण नव्हतो ही चुटपूट त्यांच्या मनाला लागली होती त्यामुळे आज शहरातच असल्याने अगदी आठवणीने त्या नानेकर गुरूजींच्या घरी गेल्या आणि त्यांचा सहकुटुंब हदयसत्कार केला, त्यांच्या दीर्घायुष्याची कामना केली, शुभेच्छा दिल्या व छान गप्पाही मारल्या. मंत्री असूनही गुरू-शिष्याचे नाते जपत पंकजाताईंनी जी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, ते पाहून नानेकर गुरूजी भारावून गेले. यावेळी त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित होता. ना.पंकजा मुंडे यांनी शालेय जीवनातील अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. नानेकर गुरुजींनी देखील लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या आणि आपल्या विद्यार्थीनीची प्रगती बघून समाधान व्यक्त केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !