बीड जिल्ह्यातील नद्यांचे व पारंपारिक जलस्रोत यांचे पुनर्जीवन करून जिल्हा दुष्काळ मुक्त करावा - वनश्री मेजर एस पी कुलकर्णी

 अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)- पंकजाताई च्या रुपाने बीड जिल्ह्यात पर्यावरण खाते मिळाले. त्यांच्याच काळात जलस्वराज्य योजना प्रभावीपणे राबवून शेतातील पाणी शेतातच रुजवण्याचा प्रयत्न झाला. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी त्यांच्या पुढाकारांनी जिल्ह्यात जेवढ्या नद्या ह्या मृतावस्थेत आहेत त्यांचे पुनर्जीवन करावे.  व प्रत्येक गावात पूर्वीच्या काळी गावातील पावसाचे पाणी गावातच रोखण्यात जायचे. प्रामुख्याने आड, विहिरी, बारव हे जलसाठे होते. या पाण्याने गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटायचा व ते पाणी काढण्यासाठी श्रम लागायचे तेव्हा पाण्याची महत्त्व लोकांना होते.  लोक पाणी जपून वापरत होते. परंतु कालांतराने आड, विहिरी, बारव याची जागा प्लास्टिकने व्यापून टाकली व लोकांनीही ते बुजवून टाकले. या परिसरात अतिक्रमण, सिमेंटची जंगले उभी राहिली ज्यामुळे पावसाचे पाणी मुरण्यास अडचण येते. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त झाला. आज टॅंकरने पाण्याचा पुरवठा गावात होत आहे. त्यासाठी ताईंच्या मार्गदर्शनाखाली पावसाचा प्रत्येक थेंब मुरवणे यासाठी लोक चळवळ उभी राहू शकते. तसेच जंगलाचे ही म्हणजेच वृक्षाचे प्रमाण हे फक्त पाच ते सहा टक्के आहे. ते साधारणतः 33% होणे गरजेचे आहे. त्यासाठी नुसते शासनावर अवलंबून न राहता गावागावातील लोकांनी पुढे येऊन यामध्ये सहभाग नोंदवला तर बीड जिल्हा हा महाराष्ट्रातून अग्रेसर होईल लोकांच्या हाताला काम लागेल. बारमाही नदी वाहती राहिली तर नदी काठावरील शेतकरी माळ पिकवतील व पाण्याची टंचाई दूर होईल. गावागावात आज सप्ताह सुरू आहेत. लोक मोठमोठी वर्गणी देऊन ते साजरे करतात. त्याचवेळी सप्ताहाच्या वर्गणीचा काही भाग जलसंवर्धन व वृक्ष संवर्धनासाठी दिला तर जलक्रांती होईल. यासाठी सर्वांनी पुढे यावे. या दोन महिन्यातच पुनर्जीवन केले तर पावसाचे पाणी साठवण्यासाठी वॉटर बँक तयार होईल व जिल्हा सुजलाम सुफलाम होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार