दोघा सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधून आवदाच्या पवन चक्कीचे १३ लाख रु चे साहित्याची चोरी
केज :- पवनचक्कीच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून पवन चक्कीचे सुमारे १३ लाख रु. किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विडा येथे आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीचे पवनचक्की उभारणीचे काम सुर आहे.
दि. ८ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे २:३० वा. च्या सुमारास पवन चक्की उभारणीच्या कामावर काम करीत असलेले सुरक्षा रक्षक तेथे झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांना त्यांच्या चादर फाडून त्याने हातपाय बांधले आणि पवन चक्कीचे केबल व इत्तर साहित्य चोरून नेले आहे.
या प्रकरणी सुरक्षारक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांनी साहित्य चोरीची माहिती आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्या नुसार अधिकाऱ्यांच्या तक्रारी नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा