प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रदिनी परळीत सद्भावना संकल्प सत्याग्रह 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      बीड जिल्ह्यातील जातीय विद्वेषाची धार कमी करुन सामाजिक सौहार्द निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा काढल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रदिनी(१मे) परळीत सद्भावना संकल्प सत्याग्रह करण्यात येणार आहे.

     स्व.संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर काहिसा जातीय विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.यामुळे जनजीवन प्रभावित झाले.बीड जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द टिकून रहावे. आठरापगड जातीधर्मातील सामाजिक जनजीवन हे सलोखा व गुणागोविंद्याचे असावे या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाची राजकारण विरहित भूमिका आहे.या भूमिकेतूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा काढली होती.या यात्रेत बीड जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील नागरिक उत्स्फूर्त सहभागी झाले होते.याच अनुषंगाने पुढचा टप्पा म्हणून परळी वैजनाथ येथे महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सकाळी १० ते २ सद्भावना संकल्प सत्याग्रह करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनीताई पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहूल सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी काँग्रेसचे नेते प्रविण शेप, परळी शहराध्यक्ष सय्यद हनीफ, प्रकाश देशमुख, शशीशेखर चौधरी, प्रकाश मुंडे, विश्वनाथ गायकवाड, शिवाजी देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार