डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन
परळी / प्रतिनिधी
महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी परळीत एक वही एक पेन या अभिनव अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक पत्रकार विकास वाघमारे व विकास रोडे यांनी दिली आहे .
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . आणि ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालना मिळावी या हेतूने एक वही एक पेन हा उपक्रम १४ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी ९ ते १ या वेळेत राबविण्यात येणार आहे. अवांतर खर्च न करता या समाजोपयोगी अभियानात सहभागी होऊन सकाळी ९ ते १ या वेळेत आपण वही पेन आणून द्याव्यात जमा झालेल्या वह्या आणि पेन गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येताना एक वही एक पेन घेऊन यावे असे आवाहन पत्रकार विकास वाघमारे यांनी केले आहे
या वेळी या अभियानाचे संस्थापक विकास रोडे ही उपस्थित राहणार आहेत. तरी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याचे आवाहन विकास वाघमारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०२८३४७३५८ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा