इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

डाॅ.अद्वैत देशपांडे याचे राष्ट्रीय स्तरावरील एम.सी.एच परीक्षेत घवघवीत यश

अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)-अंबाजोगाई येथील डॉ.अद्वैत सतिश देशपांडे यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील नीट अति विशेषोपचार एम सी एच पात्रता परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून, या परिक्षेत त्यांने ६०० पैकी ४६० गुण मिळवून संपूर्ण भारत देशातून १९० वा क्रमांक पटकावला आहे. 

       पुढे मुत्राशय विषयात उच्च शिक्षण व प्राविण्य मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी,जिद्द,परीश्रम तसेच श्रीदत्त,सर्वज्ञ दासोपंत कृपा,आई डॉ. अर्चना देशपांडे,वडिल डॉ.सतिश देशपांडे,बहिण डॉ. अपूर्वा देशमुख,काका, निवृत्त अभियंता विष्णु कुमार देशपांडे,निवृत्त प्रा.रत्नाकर देशपांडे, काकु,मामा,अनिल कुलकर्णी,इतर नातेवाईक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे डॉ.अद्वैत देशपांडे यांनी सांगितले.डॉ.अद्वैत यांनी मिळविलेल्या घवघवीत यशबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत  आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....