सरस्वती नदी अतिक्रमण:मंत्री पंकजा मुंडे यांनी कान उघडणी केल्यानंतर नगरपरिषदने २५ जणांना बजावल्या नोटीसा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      परळी शहरातील पुरातन नदी असलेल्या सरस्वती नदीवर अनाधिकृत प्रचंड अतिक्रमणे झालेले असून या नदीपात्रात भराव टाकून व अनाधिकृत खोदकाम करून या नदीवरच चढाई करण्याचा प्रयत्न झाला होता. ही बाब पंकजा मुंडे यांनी गांभीर्याने घेत न.प. प्रशासनाची कानउघडण केली होती. त्याच प्रमाणे स्वतः या घटनास्थळी जाऊन प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता न.प. प्रशासन खडबडून जागे झाले असून 25 जणांना नगरपरिषदेने नोटीसा बजावल्या आहेत. 


नदीतील अतिक्रमणे स्वतःहून न काढल्यास नप प्रशासन करणार कायदेशीर कारवाई असल्याची मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी माहिती दिली.पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील सरस्वती नदीत होत असलेल्या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत त्याची पाहणी केली होती.परळीच्या जुन्या गावातून वाहत असलेल्या सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्याच्या होत असलेल्या कामाबद्दल मंत्री मुंडे यांनी पालिका प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर आता परळी नगरपालिका प्रशासनाने नदीपात्रात अतिक्रमण केलेल्या २५ नागरिकांना नोटीसा बजावल्या आहेत. 

      अंबेवेस भागातील सरस्वती नदीपात्रात अतिक्रमण होत असल्याचे दिसून आल्यावर आम्ही तिथे भेट दिली व ते काम थांबवले. आम्ही अतिक्रमणाच्या बाबतीत संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या बाबतीत आम्हाला निर्देश दिले होते.पात्रात अतिक्रमण करणाऱ्यांना आम्ही कायदेशीर कारवाई करण्याच्या बाबतीत २५ नागरिकांना नोटीसा दिल्या आहेत.नदी पात्रात अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही कांबळे म्हणाले आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार