अंबाजोगाई येथे २७० वा जागतिक होमिओपॅथी दिवस उत्साहात साजरा

 अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)....

 अंबाजोगाई होमिओपॅथी डॉक्टर संघटनेतर्फे २७० वा जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला, यामध्ये प्रामुख्याने अंबाजोगाई व परिसरातील डॉक्टरांची संख्या लाक्षणिय होती .होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हनेमन जयंती अंबाजोगाई येथे दरवर्षी  साजरी केली जाते. १० एप्रिल १७५५ रोजी जन्मलेल्या डॉ. हॅनिमन यांनी होमिओपॅथी उपचार  तत्त्वांनी वैद्यकशास्त्रात क्रांती घडवून आणली. जगभरातील होमिओपॅथिक तज्ञ आणि उत्साही लोक हा दिवस कृतज्ञतेने साजरा करतात. हा दिवस पर्यायी औषधांमधील त्यांच्या प्रचंड योगदानाची आठवण करून देतो, नैसर्गिक उपचार आणि वैयक्तिक काळजीवर भर देतो. या दिवशी, होमिओपॅथीच्या फायद्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि डॉ. हॅनिमन यांच्या शाश्वत वारशाला आदरांजली वाहण्यात आली.भविष्यात  होमिओपॅथी सेमिनार, मोफत वैद्यकीय शिबिरे आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्याचा  सर्व सदस्यांनी मनोदय व्यक्त केला.

 प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ.सॅम्युअल हॅनिमन, होमिओपॅथीचे जनक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. होमिओपॅथी शास्त्राचा प्रसार व प्रचार होण्यासाठी मान्यवरांनी विचार मांडले व सर्व उपस्थित डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बहुसंख्येने होमिओपॅथी  डॉक्टरांची उपस्थिती होती . यावेळी - डॉ.रिता रामावत,  ,डॉ. सुवर्णा पाचेगावकर ,डॉ. विजय तापडिया , डॉ लतीफ पठाण , डॉ.भगवान फुंदे, डॉ. असद जानुल्ला, डॉ. अमोल दौड, डॉ. चंद्रहंस कांदे , डॉ.कांदे मॅडम ,डॉ हाश्मी सर ,डॉ. विठ्ठल  केंद्रे ,डॉ.असलम खान, डॉ प्रसाद चिपडे ,डॉ गजानन पवार, डॉ. समद शेख, डॉ. आदिती देशमुख ,डॉ स्वाती हारे, डॉ ज्ञानदा कुलकर्णी , डॉ .ज्योती वैष्णव  ,डॉ.सुप्रिया नाळपे , डॉ.मयुरी तरंगे,डॉ.नबीला शेख, डॉ.प्रणिता साखरे ,डॉ रेणु घुंड्रे, डॉ. इमरान अल्ली. डॉ. घुंडरे  , व श्री. सचिन हारे.

जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यासाठी  डॉ. संजय सोळुंके, डॉ.निशिकांत पाचेगावकर ,डॉ. अविनाश देशमुख व डॉ.बाळासाहेब हाके यांनी विशेष परिश्रम घेतले .डॉ. अश्विनी भुसारे यांनी  उपस्थित मान्यवर आणि सदस्यांचे आभार मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !