इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

 परळीत एक वही एक पेन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी दिली भेट


परळी प्रतिनिधी.    

     महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत एक वही एक पेन हे अभियान परळी शहरात बाबासाहेबांच्या जयंती दिनी राबविण्यात आले. या अभियानास महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी भेट दिली तसेच यावेळी त्यांनी या अभियानाचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते चिमुकल्यांना वही,पेनचे  वाटप करण्यात आले.

     रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात युवा कार्यकर्ते विकास रोडे व पत्रकार विकास वाघमारे यांच्या संकल्पनेतून एक वही एक पेन अभियानाचे उद्घाटन इंटक चे युवक प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे, रेल्वे पोलीस निरीक्षक बी.एस.कांबळे तर अध्यक्ष स्थानी मुफ्टाचे जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब आदोडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत अजयकुमार गंडले,लेखक, दिग्दर्शक प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे, जेष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव झिलमेवाड, संपादक अनिल सावंत, पृथ्वी शिंदे,पत्रकार संभाजी मुंडे, पत्रकार दत्ता काळे,सुजीत कांबळे, पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, पत्रकार धीरज जंगले, अनंत कुलकर्णी,पत्रकार महादेव शिंदे, पत्रकार विजय रोडे,वसंतोष कोदरकर,डोंबे मामा, शिवाजीराव बनसोडे आदी उपस्थित होते.

   या अभियानास माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे  यांच्या सह रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे,भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, जिल्हा परिषदेचे गट नेते अजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे,प्रा . दासू वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते डॉ.विनोद जगतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके,सिराजभाई,अनंत इंगळे,रवी मुळे, महेंद्र रोडे,भीमराव डावरे,प्रा.विलास रोडे, सुभाष वाघमारे,विलास ताटे , अँड.दिलीप उजगरे,लक्ष्मण वैराळ सर,मारोती वाघमारे आदी उपस्थित होते.

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास रोडे, पत्रकार विकास वाघमारे, प्रशांत रोडे, गौतम रोडे,नवनाथ दाने, विद्याधर सिरसाठ,आकाश देवरे, पत्रकार खांडेकर आदिंनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....