तब्बल एक महिन्यापासून बंद पडलेली सिटीस्कॅन मशीन चालू करण्यात अखेर अंबाजोगाई शासकीय रुग्णालय प्रशासनाला यश
अंबाजोगाई /वसुदेव शिंदे
अंबाजोगाई येथील प्रसिद्ध असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथील सिटीस्कॅन मशीन एक महिन्यापासून बंद होती त्यामुळे शासकीय दवाखान्यातून अनेक रुग्णांना आपल्या उपचारासाठी खाजगी अथवा परळी केज या ठिकाणी जाऊन सिटी स्कॅन करावे लागत होते त्यामुळे रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून पैशाची मोठ्या प्रमाणात लूट होत असताना अंबाजोगाई येथील लोकप्रतिनिधींनी कधीही रुग्णांची अथवा नातेवाईकाची लूट थांबविण्याचा प्रयत्न केला नाही शेवटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णव नातेवाईकाची लूट थांबवण्यासाठी पुढाकार घेतला व खास यवतमाळ येथून स्पेशल इंजिनियर यांना बोलावून गेल्या एक महिन्यापासून बंद पडलेले सिटीस्कॅन मशीन चालू करण्यात यश मिळवले आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णांना यापुढे आता बाहेर जाण्याची वेळ येणार नाही याची काळजी रुग्ण प्रशासनाने घेतली असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्ण प्रशासनाने सांगितले आहे तर रुग्णालय प्रशासनाचे सर्व स्तरातून व आलेल्या इंजिनियर चे कौतुक होत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा