पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध PTNTS परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

पाटोदा / अमोल जोशी......    

     पाटोदा शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा आयोजित १५ वर्षापासून सुरू असलेला उपक्रम पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर होऊन या निकालामध्ये यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा येथोचित सन्मान सोहळा विद्यालयाच्या भव्यप्रांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

     पी टी एन टी एस प्रज्ञाशोध परीक्षेचा १५ वा बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव तथा मार्गदर्शिका सौ सत्यभामाताई रामकृष्ण  बांगर तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आबासाहेब हंगे हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती परीक्षा प्रायोजक यश कॉम्प्युटरचे संचालक बाळासाहेब मंडलिक, अजित वालेकर सेवाभावी संस्थेचे संचालक सुजित वालेकर, स्वर्गीय जगन्नाथराव सानप यांच्या स्मरणार्थ प्रा.प्रदीप सानप ग्रामविकास फाउंडेशन येवलवाडी ( ना.) चे संचालक नागरगोजे, स्वर्गीय सिंधुबाई सुमंतराव नंद यांच्या स्मरणार्थ प्रा. सुधीर नंद, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस पाटोदा सद्गुरु गरजे, प्रमोद गरजे, मुख्याध्यापक अण्णासाहेब खंडागळे पत्रकार विजय जोशी पत्रकार हमीद पठाण पत्रकार शेख जावेदे पत्रकार इद्रिस चाऊस हे होते यावेळी विद्यालयाबरोबरच तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख होऊन स्पर्धा परीक्षा विषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती नाहीशी होऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यालयाने सुरू केलेला उपक्रम आदर्श  असून यामुळे तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या पदावर विराजमान होतील असा आशावाद अध्यक्षपदावरून बोलताना सौ सत्यभामाताई बांगर यांनी केला तर भविष्यातील डिजिटल काळामध्ये विद्यार्थ्याने सक्षम होण्यासाठी व आपल्या तालुक्याची मागासलेपणाची ओळख नाहीशी करण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी एकमेव माध्यम असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन प्राचार्य डॉ.आबासाहेब हांगे यांनी केले. यावेळी विद्यालय गेल्या अनेक वर्षापासून परीक्षेसारखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे त्याचा आदर्श जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात व्हावा असा मनोदय पत्रकार तथा माजी नगरसेवक विजय जोशी व अण्णासाहेब खंडागळे यांनी व्यक्त केला.

     झालेल्या परीक्षेतून गट अ तिसरी ते चौथी या गटामध्ये प्रथम पारितोषिक कुमारी सृष्टी सुशीलकुमार सुरवसे जि प प्रा शा तळे पिंपळगाव, दुतीय पारितोषिक कुमारी प्रांजल भागवत गरजे जि प प्रा शा दासखेड, तृतीय पारितोषिक वेदांत विनोद वराट जि प प्रा शा मंगेवाडी, शंतनू सुनील नाटकर जि प प्रा शा दासखेड, तर उत्तेजनार्थ कुमारी सई संतोष लवांडे जि प प्रा शा भटगल्ली, आयुष राहुल मगर योगीराज न्यू इंग्लिश स्कूल पाटोदा, कुमारी ज्ञानश्री महादेव जाधव श्रीमती लक्ष्मीबाई कन्या शाळा पाटोदा, कुमारी श्वेता सुनील चौरे जि प प्रा शा सोनेगाव, कुमारी प्रांजल संतोष भोसले नवनिर्माण प्राशा पाटोदा, कुमारी प्राजक्ता बाळू ढोले जि प प्रा शा नफरवाडी, कुमारी श्रेया श्रीकांत बुधवंत जि प प्रा शा नफरवाडी, गट ब इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम पारितोषिक हर्षद हरिदास घुमरे, जि प प्रा शा पारगाव घुमरा, कुमारी स्वरा संजय राख वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, द्वितीय पारितोषिक ओम सत्यवान निर्मळ वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, सार्थक योगेश कदम वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, तृतीय पारितोषिक कुमारी उत्कर्ष कल्याण पाळवदे वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, उत्तेजनार्थ पारितोषिक कुमारी भाग्यश्री रावसाहेब सानप वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, कुमारी राजनंदनी मेघराज कदम वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, कुमारी भक्ती अशोक नागरगोजे भामेश्वर विद्यालय पाटोदा, कुमारी कल्याणी किसन देव सानप भामेश्वर विद्यालय पाटोदा, कुमारी ढवळे प्रणिती दिनेश वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, प्रथमेश राहुल मगर वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, तर गट क इयत्ता आठवी ते दहावी प्रथम पारितोषिक कुमारी तनिष्का नवनाथ घुमरे वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, ओमराजे अशोक नागरगोजे भामेश्वर विद्यालय पाटोदा दुतीय पारितोषिक कुमारी साक्षी रामदास गीते वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, तृतीय पारितोषिक कुमारी वैभवी परसराम कुरे वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, कुमारी प्रगती अरुण तांबे वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, पृथ्वीराज भरत गायकवाड भामेश्वर विद्यालय पाटोदा, पृथ्वीराज प्रकाश बांगर हुतात्मा देवराव विद्यालय भायाळा, ओम श्याम सुंदर नागरगोजे वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा,उत्तेजनार्थ पारितोषिक रुद्र हरिदास घोडके वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, सलमान फैयाज सय्यद वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, कुमारी श्रेया धनंजय जाधव वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, भूषण भीमराव डिडूळ वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, गोकुळ उद्धव भवर वसंतराव नाईक विद्यालय पाटोदा, हे सर्व विद्यार्थी गुणांनुक्रमे पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झाले असून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या गुणगौरव सत्कार प्रसंगी विजेते विद्यार्थ्याबरोबर विद्यार्थ्यांचे पालक, भगिनी, तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक  शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा परीक्षेचे मुख्य संयोजक तुकाराम तुपे यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय राख व इतर शिक्षकांनी केला तर आभार व संचलन स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख एम आर नागरगोजे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार