सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे; जीर्णोद्धार वादावर हभप बंडा तात्या कडाडले, मुख्यमंत्र्यांना भेटणार

अहिल्यानंगर : गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंद्यात (srigonda) संत श्री शेख महंमद महाराज मंदिराच्या ठिकाणी दर्गाह ट्रस्ट स्थापन केल्याने वेगळाच वाद सुरू झाला आहे. त्या दर्गाह ट्रस्टला विरोध करत ग्रामस्थांनी आज आंदोलन सुरू केलं असून हभप बंडा तात्या कराडकर महाराजांनी आंदोलनस्थळी जाऊन येथेील मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करावा, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे म्हटले. ह.भ.प बंडा तात्या कराडकर (karadkar) यांनी श्रीगोंद्यातील संत श्री शेख महंमद महाराज मंदिरातील वादावर आपला परखड मत मांडलं आहे. "सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे" अशी घोषणा देत भाषाणाची बंडा तात्या महाराजांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. सध्या श्रीगोंद्यात संत श्री शेख महाराजांचा समाधी उत्सव साजरा केला जातो, त्याठिकाणी  कोणीही आपल्या समाजात विष कालवू नये. बासुंदी करण्यासाठी अनेक वस्तू लागतात. मात्र, ती बासुंदी खराब करण्यासाठी अमीन शेख सारखा एखादा खडा असतो, असे म्हणत कराडकर महाराजांनी शेख महाराजांचे वंशज असलेल्या अमीन शेख यांच्यावर निशाणा साधला. तसेच, अमीन शेखसारखा खडा बाजूला करणे गरजेचा आहे, असेही कराडकर महाराजांनी म्हटले. 

मी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार

श्री संत महंमद महाराज हे हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतीक असून ते कुठल्याही एका समाजाचे नाहीत. संत महंमद महाराज यांची जुनी परंपरा आहे, या ऐक्यात एक समाजकंटक मिठाचा खडा टाकत आहे, हे वारकरी समाज कधीही सहन करणार नाही. शासनाने कुठलाही विलंब न करता चुकीचा ट्रस्ट रद्द करावा अशी मागणी बंडा तात्या कराडकर यांनी शासनाकडे केली आहे. श्रीगोंदा येथे धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते. श्री संत महंमद महाराज हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. संत शेख महंमद महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे, याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. आम्हाला बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आणू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करेल. तसेच, लवकरात लवकर मंदिर जीर्णोद्धार करावा अशीही विनंती बंडा तात्यांनी ग्रामस्थांना केली.

नेमका वाद काय?

श्री संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून संत शेख महंमद महाराजांची ओळख आहे. मुस्लिम कुटुंबातील जन्म असतानाही संत शेख महंमद महाराज यांनी भागवत धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रचार-प्रसार केला. श्रीगोंदा (ahilyanagar) शहरात त्यांची संजीवन समाधी आहे. मात्र, या संजीवन समाधीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे, असे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीला वाटते तर शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणारे अमीन शेख यांनी मात्र मंदिर परिसरात "सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह" नावाने ट्रस्ट सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन, हे वाद निर्माण झाला आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार