परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी

1.प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यांत यावा. सायरन दोन मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी गॅस लाईन बंद करून इमारतीच्या खाली येवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

2. सायरन एकाच आवाजामध्ये 2 मिनिटे वाजल्यानंतर धोका संपल्याची सूचना मिळत असते, त्यावेळी सर्व नागरीकांनी ज्या ज्या ठिकाणी आश्रय घेतला आहे त्याठिकाणावरून सुरक्षित बाहेर पडून आपल्या सर्व परिसराची पाहणी करून तसा अहवाल प्रशासनाच्या नियंत्रण केंद्रास देण्यात यावा की जेणेकरून आपल्याला त्वरीत मदत उपलब्ध करता येईल.


3. सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असताना आपल्यासोबत पिण्याच्या पाण्याचा साठा, कोरडे अन्न (ड्रायफुड), तसेच औषधे सोबत ठेवावेत.


4. युध्दजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्यासोबत रेडिओ, मोबाईलचा वापर करा की जेणेकरुन प्रशासनानी वारंवार दिलेल्या सुचनांचे आपणांस पालन करता येईल.


5. प्रकाशबंदी (Blackout) नियमासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे.


6. युध्दजन्य परिस्थितीमध्ये कोणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल.


7.युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरुन न जाता लोकांचे मनोधैर्य उंचावणे महत्वाचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!