इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

19 जोडपी झाली विवाहबद्ध, मान्यवरांची उपस्थिती

 जे. के. कन्स्ट्रक्शनचा मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटात

19 जोडपी झाली विवाहबद्ध, मान्यवरांची उपस्थिती


गरीब कुटुंबांना आधार दिल्याबद्दल समाजाकडून जाफर खान, राजा खान यांचा सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मुस्लिम समाजातील गोरगरिबांची सोय व्हावी म्हणून येथील जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने आयोजित केलेल्या मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 19 जोडपी विवाहबद्ध झाली. अतिशय उत्साहात आणि थाटात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. गरीब कुटुंबांना आधार दिल्याबद्दल समाजाच्या वतीने विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक तथा जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, हाजी राजा खान यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

    मलकापूर रोडवरील भव्य दिव्य अशा जे. के. फंक्शन हॉल येथे  रविवार दि. 4 मे रोजी सकाळी 11 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा थाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खोट्या प्रतिष्ठा आणि रूढी परंपरा यामुळे अनेक गरीब कुटुंबांना कर्ज काढून लग्न करावे लागते. समाजातील गोरगरीब यांची होणारी अडचण लक्षात घेऊन जे. के. कंट्रक्शनच्या वतीने या मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अगदी घरच्या विवाह सोहळ्यासारखे व्यवस्था खान बंधूंनी या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये केली होती. समाजातील तब्बल 19 जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. सर्व जोडप्यांच्या नातेवाईकांचेही अतिशय शाही स्वागत करण्यात आले.

     मुस्लिम समाजाच्या या सामूहिक विवाह सोहळ्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई, माजी नगराध्यक्ष आय्युब खान पठाण, युवक नेते मुन्ना बागवाले, न. प. चे निवृत्त नगरअभियंता बेंडले, पत्रकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. 

   या सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, हाजी राजा खान, उमर खान उस्मान खान, वाहेद खान जाफर खान, शाहेद खान राजा खान, शेख मझहरूद्दिन अलीमोदिन, जफर खान जाफर खान, नदीम खान जाफर खान, हाफेज तारेक खान एजाज खान, फेरोज खान उमर खान, फाजेब खान उमर खान, तौफिक खान एजाज खान यांनी परिश्रम घेतले. 


*समाजाकडून जाफर खान व हाजी राजा खान यांचा सत्कार*

    

      मुस्लिम समाजातील गोरगरिबांच्या अडचणी लक्षात घेऊन जेके कंट्रक्शनचे संचालक जाफर खान व हाजी राजा खान यांनी या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आधार दिल्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने या दोघांचाही भावपूर्ण सत्कार करण्यात आला. 


पहेलगाम येथील शहीदांना श्रद्धांजली

    पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत झालेल्या सर्वधर्मीय शहिदांना विवाह सोहळ्यापूर्वी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारतातील सर्व मुस्लिम समाज हा केंद्र सरकारसोबत असून देशावरील हल्ला सहन केला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला. तसेच या अमानुष हल्ल्याबद्दल पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!