◆ जनहिताच्या मागण्या पूर्ण करा- किसान सभा
मागण्या पूर्ण न झाल्यास सिरसाळ्यात निदर्शने
परळी / प्रतिनिधी
पीक विमा, कर्ज माफी व गायरान जमिनीवर राहती घरे नावावर करणे यासह इतर मागण्याकरिता बीड जिल्हा किसान सभेकडून सोमवार दि 2 जून रोजी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनाबाबत किसान सभेने परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
परळी येथील उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पिकविम्यापासून सर्व वंचित शेतकऱ्यांना ताबडतोब पिक विमा वितरित करण्यात यावा,सर्व शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण पीककर्ज माफ करावे, गायरान जमिनीतील राहती घरे नावावर करणे व कसणाऱ्या जमिनी धारकांच्या नावे करण्या बाबत व गायरान जमिनीतील सोलारसाठी राहती घरे उठवून लोकांना भूमिहीन व बेघर करण्याचा घाट घातला जात आहे तो त्वरित बंद करावा व उलटपक्षी लोकांची घरे व जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात या मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभेकडून तालुक्यातील सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत.वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा निदर्शने दरम्यान उदभवलेल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नावर प्रशासन जवाबदार राहील असे किसान सभा बीड कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा