परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परळीत 20 मे रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर सीटू कामगार संघटनेचा मोर्चा

परळी वैजनाथ:- महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समीतीच्या वतीने महाराष्ट्रव्यापी संप आहे. बीड जिल्हा सीटू कामगार संघटना संपात सह‌भागी होत आहे. त्या दिवसी परळी तालुक्यातील सीटूशी जोडलेल्या कामगार संघटना परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजता भव्य मोर्चा काढणार आहेत.

     राज्य सरकार व केंद्र सरकारचे कामगार विरोधी थोरणामुळे प्रचंड बेरोजगारी निर्माण झालेली आहे. आशा वर्कर व अंगणवाडी कर्मचारी यांना सरकारी कामगारांचा दर्जा मिळावा, खाजगीकरण थांबवावे, सरकारने कंत्राटीकरण थांबवावे, कामगारासाठीच्या चार कामगार संहीता मागे घ्याव्यात, कामगारांना किमान वेतन 26000रु द्यावे: सर्व ६० वर्षावरील पेन्शन नसणाऱ्या  सर्व नागरीकांना 10000 रु पेन्शन द्यावी.परळी तालुक्यातील आशाचे सर्व प्रकारचे थकीत मानधन द्यावे,  घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाने घरेलू कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शिष्यवृत्ती द्यावी, बांधकाम कामगारांचे सर्व प्रश्न तालुक्यातील डब्लूएफसी केंद्राने सोडवावेत. ग्रामीण भागातील बांधकाम  कामगारांना नोंदणीसाठी ग्रामसेवकांनी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्यावे इत्यादी प्रमुख मागणीसाठी परळी तालुक्यातील बांधकाम कामगार, आशा, घरेलू कामगार असंघटित कामगार मोठ्या प्र‌माणात सहभागी होणार आहे. कामगारांनी मोठ्या संस्थेने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहान आशाच्या नेत्या हेमा काळे, आशा लांडगे, किरण सावजी, सिटूचे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे, शेख जावेद, कामगारनेते जालिंदर गिरी, घरकामगार रोहिणी लोणीकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!