4 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार थाटात विवाह सोहळा

 जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहोळ्याचे आयोजन

4 मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार थाटात विवाह सोहळा



गरजवंत जोडप्यांनी लाभ घ्यावा- जाफर खान, हाजी राजा खान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बांधकाम क्षेत्रात नामांकित असलेल्या जे. के. कन्स्ट्रक्शनच्या वतीने मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याचा गरजवंत जोडप्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, हाजी राजा खान यांनी केले आहे. 

      दिनांक 4 मे रोजी जे. के. फंक्शन हॉल, मलकापूर रोड येथे सकाळी 11 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा थाटात आणि उत्साहात संपन्न होणार आहे. समाजातील प्रतिष्ठा आणि रूढी परंपरा यामुळे अनेक गरीब कुटुंब कर्ज काढून लग्न करतात. अनावश्यक खर्च केला जातो. होतकरू आणि गरजू कुटुंबासाठी मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी दिनांक 25 एप्रिलपर्यंत मुफ्ती सय्यद अशफाक (9850565541), एजाज खान उस्मान खान (9822513513), मॅनेजर शेख शफीक (9834507201) यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

     या सामूहिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन जाफर खान उस्मान खान, हाजी राजा खान उस्मान खान, उमर खान उस्मान खान, वाहेद खान जाफर खान, शाहेद खान राजा खान, शेख मझहरूद्दिन अलीमोदिन, जफर खान जाफर खान, नदीम खान जाफर खान, हाफेज तारेक खान एजाज खान, फेरोज खान उमर खान, फाजेब खान उमर खान, तौफिक खान एजाज खान यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !