इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त रक्तदान शिबीर ;41 दात्यांचे रक्तदान 

परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)

          येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात श्री शनैश्वर जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यास युवक,महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

             शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याशी श्री शनी मंदिरात गेल्या १३ वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा श्री शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त शुक्रवारी (ता.२३) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यात युवक, महिला, पुरुष यांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी अनेकांनी सपत्नीक आपले रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तृत्व पारपाडले. या रक्तदान शिबीरात रक्तसंकलनाचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढी आंबेजोगाई येथील सहकार्य लाभले. रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी, तेली युवक संघटना, श्री शनैश्वर प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, शनैश्वर भक्त मंडळ, शनैश्वर महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

--------------------------------------------------

रविवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा 

           तेली समाजाच्या वतीने शनैश्वर जन्मोत्सवानिमित्त रविवारी (ता.२५) १० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!