95.80% गुण मिळवत आकांक्षा अमर दुबे हिचे दहावीत घवघवीत यश


परळी वैजनाथ, प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. आकांक्षा अमर दुबे हिने 95.80% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.


आकांक्षाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ती लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून तिने विविध स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यू हायस्कूल चे प्राचार्य व सर्व शिक्षकवृंदांनी आकांक्षाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !