महावितरण सहाय्यक अभियंता पदावर अमृता लखापती रूजू, तेली समाजाच्या वतीने स्वागत 

परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)

   महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड च्या येथील उपविभागीय कार्यालयात नुकत्याच अमृता संजय लखापती सहाय्यक अभियंता (वर्ग २) पदावर रुजू झाल्या आहेत. प्रभारी उपकार्यकारी अभियंता अभिजीत राठोड यांनी त्यांना रुजू करून घेतले. याबदल तेली समाजाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

     अमृता लखापती यांचे उपविभागात आगमन झाल्यावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. कनिष्ठ अभियंता रूपाली घोडगे, सहाय्यक लेखापाल संतोष आलापुरे आणि लिपिक वीरेंद्र शिंपी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता अभिजीत राठोड यांनी अमृता लखापती यांना शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर बुधवारी (दि.२१) तेली समाजाच्या वतीने अमृता लखापती यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी कोलूघाणा सोसायटीचे उपाध्यक्ष सुर्यकांत व्यवहारे, संचालक संगमेश्वर फुटके,प्रा मधुकर शिंदे, छगन आप्पा क्षीरसागर, प्रा प्रविण फुटके, शिवरुद्र क्षीरसागर आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !