परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शस्त्रसंधी होणार का ? युद्ध खरच टळणार का?

 भारत-पाक तणाव निवळणार! ट्रम्प यांचा महत्त्वाचा दावा; काल रात्रभर झालेल्या चर्चेत काय घडलं?

        भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला संघर्ष संपण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा दावा केला आहे. दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचं ट्रम्प यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

       गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पाश्वभूमीवर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या या एक्स हँडलवरून एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ युध्दविरामास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न राष्ट्रं आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास त्याचे परिणाम जगावर होऊ शकतात. त्यामुळेच अमेरिकेनं यामध्ये मध्यस्थी केली. याबद्दल ट्रम्प यांनी एक पोस्ट केली आहे. 'अमेरिकेनं काल रात्रभर मध्यस्थीसाठी बोलणी केली. त्यात भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार झाले. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो,' अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!