परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

हार्दिक अभिनंदन!!!!

 बारावी - वैद्यनाथ महाविद्यालयाचा ९४.८१ टक्के निकाल

कु.नंदजा लड्डा प्रथम, कु.अनन्या सूर्यवंशी द्वितीय, तर कु. साक्षी फड तृतीय 

       परळी वैजनाथ दि.६---

                       नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत येथील वैद्यनाथ महाविद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून यावर्षीचा सर्व विद्याशाखीय  निकाल सरासरी  ९४.८१%  इतका लागला आहे. सर्वात अधिक  बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.९२%  इतका लागला आहे. तर त्याखालोखाल निकाल बारावी वाणिज्य शाखेचा ९७.४३% इतका लागला आहे.  बारावी कला शाखेचा निकाल ८३.०९%  आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाचा निकाल ८३.३३%  इतका निकाल लागलेला आहे. 

                  यात बारावी विज्ञान शाखेतून कु. नंदजा रामजीवन लड्डा (८७.३३%) ही प्रथम आली असून कु. अनन्या शेषराव सूर्यवंशी (८४.५०%)द्वितीय तर कु. साक्षी कैलास फड (८४.३३%) ही तिसरी आली आहे. बारावी वाणिज्य शाखेतून कु. सोनम रविशंकर देवकर ही प्रथम (७४.१७%), आदित्य महेश्वर निर्मळे द्वितीय(७३.६७%) , कु.पूजा बालाजी जाधव तृतीय(७३.१७%) ,तर बारावी कला शाखेतून कु. साक्षी शिवाजी जाधव प्रथम (८०.३३) ,महेश राजाभाऊ बंधने द्वितीय (७३%) व सिद्धांत सुधाकर किरवले तृतीय (६८.३३%) आला आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम या विभागातील इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी ट्रेडमधून कु. अपर्णा सुभाष वाघमारे ही प्रथम (७१.८३%) असून  अनिकेत राजाराम केंद्रे, लक्ष्मण गणेश कुकर, निशा अर्जुन जाधव हे तीन विद्यार्थी  द्वितीय ६८.०५%)  आले आहेत ,तर आदित्य उमाकांत विभुते हा तृतीय (६७.६६%)आला आहे. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ट्रेडमधून  चंद्रकांत वसंत कापसे प्रथम(६६.८२%), शिवम संतोष सोळंके द्वितीय (६४.८३%), तर प्रणव प्रकाश खोत हा तृतीय (६४.३३%)  आला आहे.  

                या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ ए. आर. चव्हाण, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. डी. के. आंधळे, प्रा. हरीश मुंडे, पर्यवेक्षक प्रा.  डॉ.नयनकुमार आचार्य, समन्वयक प्रा. यु. आर. कांदे, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. डॉ.पी.एल. कराड , महाविद्यालयातील प्रशासकीय सेवेतील सर्व कर्मचारी व इतर प्राध्यापकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!