अंबाजोगाई येथील बाराखांबी सह खोलेश्वर मंदिरास भरघोस निधी

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश; धर्मापुरी किल्ल्ला संवर्धनासाठी ३ कोटी ३९ लाख

अंबाजोगाई येथील बाराखांबी सह खोलेश्वर मंदिरास भरघोस निधी


मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून आज पर्यटन विभागाकडून परळी मतदारसंघातील प्रसिद्ध धर्मापुरी किल्ल्याच्या संवर्धन व जतन कामासाठी तीन कोटी 39 लाख रुपयांच्या निधी खर्चनास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. 


धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने मागणी केली होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी धर्मपुरी किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी एकूण नऊ कोटी रुपयांची मागणी केली होती त्यापैकी साधारण तीन कोटी 39 लाख रुपयांच्या निधी खर्च शासन निर्णयाद्वारे आज मान्यता देण्यात आले आहे. 


त्याचबरोबर अंबाजोगाई शहरालगत असलेल्या पुरातत्व विभागांनी विशेष भाग म्हणून घोषित केलेल्या सकलेश्वर मंदिर अर्थात बाराखांबी नावाने प्रसिद्ध असलेल्या स्थळाच्या विकासासाठी सुमारे 35 लाख रुपये, तसेच सुप्रसिद्ध खोलेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी सुमारे 45 लाख रुपये निधी करतात शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. 


नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी धर्मापुरी किल्ल्यासह बारा खांबी मंदिर व खोलेश्वर मंदिर यांच्या परिसराच्या विकासासाठी निधी देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांना विनंती केली होती. 


धर्मपुरी येथील भुईकोट किल्ला हा सुप्रसिद्ध असून पर्यटनाच्या दृष्टीने तो अत्यंत उपयुक्त आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून नागरी सुविधांमुळे तो वंचित राहिलेला आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासह येतील ऐतिहासिक ठेवा जोपासण्याच्या उद्देशाने, तेच प्राचीन महत्त्व असलेले बारा खांबे मंदिर व खोलेश्वर मंदिर यांच्या जीर्णोद्धाराचा व या परिसराच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे सर्व स्तरातून धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार